अनेक मान्यवरांची असणार उपस्थिती : संगीत, नृत्य, सिनेमॅटिक सादरीकरण
पणजी : माहिती व प्रसारण मंत्रालय आणि एनएफडीसी आणि गोवा मनोरंजन सोसायटीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता आज गुरुवारी ‘ड्राय सीजन’ या चित्रपटाने होणार आहे. समारोप सोहळा आज बांबोळी येथील स्टेडियमवर होणार आहे. यंदाच्या महोत्सवात 75 देशांतील एकूण 200 चित्रपट दाखवण्यात आले. त्याचबरोबर मास्टर क्लासेस, चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. आजच्या समारोप सोहळ्याला दिग्गज कलाकारांची उपस्थिती लाभणार असून यात सुकुमार दिल राजू, आनंद तिवारी, अमृतपाल सिंग बिंद्रा आणि ऑस्ट्रेलियाचे निर्माता स्टीफन वुली, अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, जयाप्रदा, श्रिया सरन, प्रतीक गांधी, समीर कोचर, श्रेया चौधरी, रित्विक भौमिक आणि नवीन कोहली उपस्थित राहणार आहेत.
प्रसिद्ध कलाकार संगीत, नृत्य आणि सिनेमॅटिक आकर्षणे सादर करतील. या समारंभात स्टेबिन बेन, भूमी त्रिवेदी आणि अमाल मलिक आणि अभिनेत्री श्रिया सरन यांसारख्या ख्यातनाम कलाकारांचे संगीत आणि नृत्य सादरीकरण, निकिता गांधी आणि दिग्विजय सिंग परियार यांचे संगीतमय कथाकथन यांचा समावेश असेल. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा होणार असून यात सर्वात प्रतिष्ठित असा सुवर्ण मयूर पुरस्कार जाहीर करण्यात येतील. ऑस्ट्रेलियन फिल्म मेकर फिलिप नॉयस यांना सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल विशेष ओळख पुरस्कार अभिनेता अल्लू अर्जुन यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल, त्याच्या ब्लॉकबस्टर पुष्पा 2 ला विशेष मान्यता मिळाल्याबद्दल प्रदान करण्यात येईल. देशाचा समृद्ध नृत्य वारसा साजरे करणारा ठरिदम्स ऑफ इंडियाठ नावाचा मंत्रमुग्ध करणारा परफॉर्मन्स संध्याकाळचा केंद्रबिंदू असेल. कथ्थक (उत्तर भारत), मोहिनीअट्टम आणि कथकली (दक्षिण भारत), मणिपुरी आणि पुंग चोलम ड्रमर्स (पूर्व भारत) आणि गरबा (पश्चिम भारत) यांसारख्या शास्त्राrय नृत्य प्रकारांमधून प्रेक्षकांना संपूर्ण भारतभर चित्तथरारक प्रवासात घेऊन जाईल.









