गोवा गोवुमानियाच्या वर्धापनदिनी उद्योजिकांचा गौरव
पणजी : गोवा गोवुमनीयाच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गोव्यातील विविध क्षेत्रातील प्रज्ञावंत महिलांचा गौरव करण्यात आला. यानिमित्ताने दरवर्षी गोव्यातील गुणवंतांच्या कार्याची पोचपावती दिली जात असते. यश मिळवायचे असेल तर दुस्रयांचे कौतुक करायला आपण शिकले पाहिजे हीच या सर्व खटपटी मागची भावना. मिरामार येथे अलीकडेच झालेल्या या झगमगत्या समारंभाला गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांच्यासह वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष आणि पर्येच्या आमदार दिव्या राणे उपस्थित होत्या. गोवुमानियाची कोअर टीम संस्थापक सिया शेख, मधुमती देवी, मोक्ष कोटीयन सिरसाट, कुशा नायक, नाझनी सलफ्रास खान, जस्मीन डिसोझा यांनी पुन्हा एकदा गोव्यात 12 हजार महिला उद्योजकांचा समूह बनविण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनऊच्चार केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रितू पुरी, शर्मिला वालावलकर, समृद्धी, रहमत शेख आणि निखत खान यांनी हातभार लावला. यावेळी पोलीस दलातील पाच महिला अधिक्रायांचा त्यांची सचोटी आणि कामाप्रतीची निष्ठा यासाठी गौरव करण्यात आला. यात पोलीस अधीक्षक सुनीता सावंत, पोलीस उपअधीक्षक नूतन वेरेकर, पोलीस निरीक्षक अनुष्का पै बीर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जया देसाई आणि हेड कॉन्स्टेबल छाया गोडकर यांचा समावेश होता.
त्याचबरोबर गोव्यातील महिला उद्योजक उर्वशी गोहील, नादिया अस्लम, मोनिशा जैन, अल्पना काळे, एलिना नाझारेथ, मौली मेहता, द्विती भल्ला, चेतना भट, कॅरल फर्नांडिस, करिना अमलानी, धृता रिखे, मेहऊन यासिन शेख, मेरीलीन पाउसकर, अंजली कामत, साफल्या प्रभुदेसाई यांच्यासोबत गोव्यातील उभरत्या उद्योजिका समृद्धी धोंड, शीना डिकुन्हा, गार्गी सागरकर, रितू बहेती, रायझन गोन्साल्वीस, सुरेखा पंडित, निवेदिता बांदोडकर, पूनम मडगावकर, याचिका चोप्रा, प्रिया शेटीया मनस्वी बोर्डेकर, प्रसन्ना कृष्णन, रहिमा तहसीलदार, सुप्रिया रायकर, रिना जैन यांचाही समावेश होता. सामाजिक क्षेत्रातील सारिका शिरोडकर, एरिका डी सिक्वेरा, शिवानी बाक्रे, नमिता शरण, हसिना बंदुकारा यांचाही समावेश होता. शीतल पै काणे, मांगिरीश सालेलकर, एकता अगरवाल आणि मधुमती देवी यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले. यावेळी ’बॉस लेडी’ या नियतकालिकाच्या द्वितीय खंडाचे प्रकाशन करण्यात आले. त्यात भारताची पहिली महिला विंडसर्फर कात्या इडा कुएल्हो आणि महिला को ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रतिमा धोंड यांची यशोगाथा आली आहे.









