भूमी हा माणसाचाच काय, तर साऱ्या जीवसृष्टीचा आधार आहे. तिला पाय लावल्याशिवाय आपले कुठलेली काम होणे अशक्यच असते. तथापि, या जगात असे एक गाव आहे, की जिथे भूमीला पाय लावण्यावरच बंदी आहे. पश्चिम आफ्रिकेतील बेनीन या देशात हे गाव आहे. हे गाव नाकोए नामक एका सरोवराच्या मधोमध वसलेले आहे. त्याची लोकसंख्याही जवळपास 20 हजार इतकी आहे.
या गावाचे नाव ‘गॅन्व्ही’ असे असून या गावात मार्ग नाहीतच. मार्गांच्या स्थानी केवळ पाणी आहे. या पाण्यातूनच नागरीकांना ये जा करावी लागते. ही ये जा सुद्धा पायाने करता येत नाही, कारण तसा नियम आहे. त्यामुळे या गावातील एका भागातून दुसऱ्या भागात जाताना, केवळ नौकांचा आधार घ्यावा लागतो. या गावातील प्रत्येक घर हे लाकडी खांबांवर बांधलेले आहे. 16 व्या शतकात या स्थानी टोफिनू नामक वनवासी समाजाने येथे वास्तव्यास प्रारंभ केला. फोन नामक अन्य एका जमातीने त्यांच्यावर आक्रमण केले होते. त्यामुळे आपल्या या शत्रूपासून सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी या सरोवरालाच आपले घर मानले. गेल्या 500 वर्षांमध्ये या जमातीने अनेक त्रासांना आणि संकटांना तोंड देत या स्थानी आपली संस्कृती रुजविली आणि फुलविली आहे. या गावातील प्रत्येक वास्तू ही पाण्याच्या पृष्ठभागापासून काही फूट अंतरावर लाकडी स्तंभांच्या पायावर निर्माण करण्यात आलेली आहे. मासे, भात हे येथील प्रमुख अन्न आहेठ्या प्रमाणात केला जातो.
हे पाण्यावरचे गाव पाहण्यासाठी पर्यटकांची वर्दळ असते. आफ्रिकेत पर्यटनासाठी गेलेला प्रत्येक जण हे गाव पहिल्याशिवाय परतत नाही. भूमीला आयुष्यात एकदाही पाय न लावलेले अनेक लोक येथे पाहून पर्यटकांना आश्चर्याचा धक्का बसतो. अशा स्थितीही गावकरी सुखी आणि समाधानी आहेत, असे त्यांना दिसून येते.









