Sanjay Raut News : आपला देश ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सवर चालतो.मोदी, शहा, फडणवीस झूट आहे.दुर्लक्ष करा. आपण एका युध्दामध्ये उतरलो आहोत.युध्दात छातीवर वार झेलणारे शिवसैनिक आहोत.सगळ्यांनी एकत्र येवून मुळ शिवसेनेचा झेंडा फडकवायचा आहे.आमचं सरकार येऊ द्या. 24 तासांत मोदी, शहा,फडणवीस शिवसेनेत येतील.ईडीच्या भयाने फडणवीस यांचा शिवसेनेत प्रवेश अशी बातमी आपण सामनात वाचू. महाराष्ट्रात स्वबळावर भगवा फडकवू असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला.वर्धापन दिनामिनित्त ठाकरे गटाचं राज्यव्यापी शिबिर आहे. या शिबिराला राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित झाले आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात फोडाफोडीचं राजकारणं सुरु आहे. दिल्लीसारखे दोन मस्ताने महाराष्ट्रातही आहेत. वाघाचं कातडं पांघरून लांडगे गोरेगावला निघाले आहेत. महाराष्ट्रासह मुंबईची लूट सुरु आहे. आमची शिवसेना कोणाला चोरता येणार नाही. दिल्लीतील नेत्यांची सध्या मुंबई वारी सुरु आहे. दिल्लीतील नेते मुंबईवर कब्जा सांगत आहेत. 88 हजार कोटी रुपयांच्या नोटा गहाळ झाला.गहाळ झालेल्या नोटांनी फोडाफोडी तर सुरु नाही ना? असा सवाल त्यांनी केला. डुप्लिकेट माल खूप असतो मात्र शिवसेना एकच आहे.निवडणुक आयोगाला पैसे देऊन तारीख ठरवली काय? असेही ते म्हणाले.
हे सत्तारांचं बोगस बियाणं नाही, बाळासाहेबांचं खरं बियाणं आहे. बापाचा बाप पाठिशी आहे तोपर्यंत शिवसेना चोरता येणार नाही.अमित शहा, नड्डा मुंबईवर ताबा सांगत आहेत.हिंमत असेल तर निवडणुका घेऊन मुंबई ताब्यात घ्या. आमचं भांडण मोदी शहांशी वयक्तिक नाही,तर भांडण आहे ते महाराष्ट्रातील द्रोह्यांशी आहे.मुंबईतील क्रिकेट देखील गुजरातला घेऊन जात आहेत. परवा बिपरजॉय नावाचं वादळ आलं. मोदींना वाटलं प्रोजेक्ट आहे. त्यांनी गुजरातला वळवलं.आणि झालं नुकसान अशी मिश्किल टीकाही केली.बाईंना फार घाई होती. आल्याही घाईत, गेल्याही घाईत अशी टिका कायंदेंवर राऊतांनी केली.
हेही वाचा- काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुखांचा भाजपात प्रवेश ; फडणवीसांनी केलं तोंडभरुन कौतुक
पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्र्यांचे पिक खूप आले आहे.आपण मविआमध्ये राहू.मी आजही उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री मानतो. कोश्यारींनी केलेली प्रत्येक कारवाई बेकादेशीर आहे.शिंदे सरकार बेकायदेशी आहे.सर्वोच्च न्यायलयानं शिंदे सरकार डिसमिस केलयं.राज्यात आपल्याला नवीन सरकार निर्माण करायचं आहे.महाराष्ट्रात स्वबळावर भगवा फडकवू.मुंबई महानगरपालिका आम्ही जिंकूच.महाराष्ट्रात बाळासाहेबांचा अपमान केला त्याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. आमच्यासोबत सूडाने वागले त्यांना व्याजासकट परतफेड करू असं आव्हानही त्यांनी केलं. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, कोण एकनाथ शिंदे, कोण 40 आमदार. तुमच्यात किती ताकद आहे आम्हाला माहित आहे. आमच्या नादाला लागू नका, असा इशारा राऊतांनी दिला.








