कोल्हापूर :
गणेशोत्सव जवळ आल्याने मंडळांची वर्गणीसाठी लगबग सुरू आहे. पण जबरदस्तीने वर्गणी घेतली, अशी तक्रार आल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करणार, असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक गुप्ता यांनी मंडळांना दिला आहे. जबरदस्तीने वर्गणी वसूल कराल तर कारवाई ही होणारच, असेही त्यांनी सुनावले आहे.
अवघ्या पंधरा दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची तयारी सुरू असून, दरवर्षीप्रमाणे गल्लीबोळांतील मंडळे लोकांकडून, व्याप्रायांकडून, राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी, स्थानिक राहिवाशांकडून तसेच समाजसेवकांकडून वर्गणी गोळा करतात. पण मंडळांनी वर्गणी गोळा करताना कोणालाही दमदाटी, शिवीगाळ करत अवाच्या सव्वा मागणी करून जबरदस्ती करू नये. असे प्रकार घडल्यास तशी तक्रार आल्यास कारवाई ही होणारच त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहीती पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिली.
गणेशोत्सव जवळ येईल तशी सार्वजनिक मंडळा बरोबरच प्रशासनाचीही तयारी चालु झाली आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने मंडळाच्या परवानगी साठी एक खिडकी चालु केली आहे. ज्या मंडळानी नोंदणी केली आहे. त्यानाच परवानगी देणेत येणार आहे. नोदंणी केली नसेल त्या मंडळांनी लवकर नोंदणी करून मंडळे रजिस्टर करावीत. मंडळ नोंदणी केलेले नसेल त्यांना गणेशोत्सव करिता प्रशासनाकडुन कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.
मंडळांनी स्वेच्छेने दिलेली वर्गणी न घेता दमदाटी व शिवीगाळ करत जोरजबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये. वर्गणी गोळा करणाऱ्यांविरोधात एखादी तक्रार पोलिस ठाण्यात आल्यास मंडळावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच रस्त्यावर मंडप घालताना मनपाची परवानगी घेणेही आवश्यक आहे. जर कुठल्याही मंडळाने जबरदस्ती वर्गणी गोळा केल्याच्या तक्रारी आल्या तर त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील. ज्या मंडळांची कागदपत्रे व्यवस्थित असतील अशा मंडळांना परवानगी देण्यात येणार आहे.. मंडळाचे रजिस्ट्रेशन पण तपासले जाणार आहे. त्यांची सर्व कागदपत्रांची तपासणी करून परवानगी दिली जाते, प्रत्येक मंडळाने धर्मादाय आयुक्तांकडून नोंदणी घ्यावी. त्याच मंडळांना परवानगी मिळणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. काही मंडळे देवाच्या कार्यक्रमाच्या नावाखाली पैशांची लोकांकडून जबरदस्तीने वसुली करतात, अशा मंडळावर पोलिस लक्ष ठेवून असणार आहेत. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणपती मंडळाची संख्या वाढेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
मंडळांनी दिलेली वर्गणी न घेता दमदाटी व शिवीगाळ करत जोरजबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये. वर्गणी गोळा करणाऱ्यांविरोधात एखादी तक्रार पोलिस ठाण्यात आल्यास मंडळावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच रस्त्यावर मंडप घालताना मनपाची परवानगी घेणेही आवश्यक आहे. जर कुठल्याही मंडळाने जबरदस्ती करू नये. असे अवाहन पोलीस प्रशासना कडुन करण्यात येत असुन. जबरदस्ती करूण वर्गणी गोळा केल्याच्या तक्रारी आल्या तर त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील.
-योगेशकुमार गुप्ता. पोलिस अधिक्षक, कोल्हापूर








