दापोली :
वर्षभरात फक्त जर रुग्णालयाच्या पायाचेच बांधकाम होणार असेल तर तुम्ही राजीनामा देऊन घरी बसा, असा सज्जड दम राज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोली. उपजिल्हा रूग्णालयात सोमवारी आयोजित दिव्यांग प्रमाणपत्र वाटप शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
ते पुढे म्हणाले, दापोली उपजिल्हा रुग्णालय हे सध्या ५० खाटांचे आहे. त्याचे श्रेणीवर्धन होऊन ते आता १०० खाटांचे होणार आहे. याकरिता ५० खाटांच्या इमारतीचे काम गेले वर्षभर सुरू आहे. एक वर्षांमध्ये केवळ जर पायाचे काम होणार असेल व तुम्हाला दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करणे जमत नसेल तर सरळ राजीनामा द्या आणि घरी बसा. यापुढे शस्त्रक्रिया शिबिरेदेखील घेणार आहे. शिवाय आपण दिव्यांगासाठी विविध सेसचा निधी एकत्रित करून रोजगार उपयुक्त गोष्टींचा विचार करून वापर केला जाईल, असेही कदम यांनी स्पष्ट केले.








