वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या सिपीआर अधिष्ठातांना सूचना
कोल्हापूर
वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून कार्यभार स्विकारल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी शेंडा पार्क येथील वैद्यकिय महाविद्यायाच्या कामकाजाची पाहणी केली. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या दुरुस्तीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषेदेचे आयोजन केले होते.
परिषदेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शेंडा पार्कतील दोन इमारतींचे काम पूर्णपणे झालेले आहे. तर उर्वरित १० इमारतीचे काम मार्चपर्यंत होईल. दिवाळीपूर्वी सी पी आर चा संपूर्ण चेहरामोहरा बदललेला दिसेल. सीपीआर मधील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली होती. त्याचा रिपोर्ट आलेला आहे त्यावर कारवाई होईल. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कोणालाही अभय मिळणार नाही. विशाल एंटरप्राइजेस संदर्भात कमिटी यासाठी नेमलेली आहे चौकशी सुरू आहे.११०० बेडचं काम अजून सुरुवात नाही तरी यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठक बोलवण्यात आली असून येत्या दोन वर्षात हेही काम पूर्ण होईल असा विश्वास आहे.
सीपीआर मधील अतिक्रमण आणि भ्रष्टाचारावर विचारणा झाली असता, सीपीआरचे अधिष्ठाता म्हणाले येत्या दोन दिवसात आम्ही सीपीआर मधील अतिक्रमण हटवू. यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणाले , की येत्या आठ दिवसात जर तुम्हाला सीपीआर मधील अतिक्रमण हटवता आले नाही, तर तुम्ही स्वेच्छानिवृत्ती घ्या. आम्ही दुसरी योजना करतो. अशा सूचन मुश्रीफ यांनी दिल्या.

पुढे वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सुरेश धस यांनी आरोप केले त्यावेळी मी विधानसभेत उपस्थित होतो आणि त्याला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलेला आहे. भाजप टार्गेट करत आहे असं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रकरणी चौकशी करतील. देवेंद्र फडणवीस कार्यक्षम मुख्यमंत्री लाभलेले आहेत ते तात्काळ याचा शोध घेऊन पर्दाफाश करतील. जोपर्यंत कोणी दोषी असेल असं आढळून येत नाही तोपर्यंत राजीनामा देण्याची आवश्यकता नाही.
जिल्ह्याचे पालकमंत्री येत्या २६ जानेवारीपर्यंत कळेल असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.








