प्रतिनिधी /पणजी
म्हादई आमची माता असून, गोवा सरकारने तीला कर्नाटकाला विकले आहे. म्हादई वाचविण्यासाठी आज आम्ही लढा देली नाही तर आम्हाला गोमंतकीय म्हणण्याचा अधिकार नाही. असे आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी सांगितले. केंद्रातील भाजप नेत्यांच्या ताटाखालचे मांजर बनलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या सांगण्यावरून म्हादई कर्नाटकाला दिली असल्याचा आरोपही मनोज परब यांनी केला.
म्हादई बचाव आंदोलन आरजीने सुरु केले असून त्याबाबत जनजागृती करण्यासाठी येथील आझाद मैदानावर झालेल्या जाहीर सभेत मनोज परब बोलत होते. कर्नाटकात विधानसभा निवडणूका होणार असून भाजप सत्ता टिकविण्यासाठी तसेच येत्या लोकसभा निवडणूकीत कर्नाटकातील अधिकाधिक खासदार निवडून आणण्यासाठी कर्नाटकाला म्हादई देण्याचे कारस्थान असून त्यात गोव्यातील भाजप नेत्यांचाही समावेश आहे. राज्यातील भाजप सरकारला गोमंतकीय जनेतेच काहीही पडून गेलेले नाही. म्हादई वळविल्यामुळे पुढील काळात गोव्याच्या जनतेवर कीती मोठे आणि भयानक संकट येईल याबाबत सरकार विचार केलेला नाही. भाजपला केवळ सत्ता मिळवायची आहे असा आरोपही मनोज परब यांनी केला.
राज्यातील एकूण जमीतील 43 टक्के जमीनीत म्हादई आहे. आज कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळविल्यास पुढील काळात गोव्यातील पर्यावरीण संपूष्टात येईलच पण पिण्यासाठीही पाणी मिळणार नाही. जमीतील पाण्याची पातळी खाली जाईल आणि विहीरींनाही पाणी मिळणार नाही. नद्या सुखल्याने समुद्राचे खारट पाणी आत येईल शेती बागायती नष्ट होतील. म्हणून हे सगळे संभाळण्यासाठी आज नवी क्रांती करणे गरजेचे आहे. म्हादई साठी लढा देतानाच गावा गावातील झरे ओहळ नद्या संभाळणे गरजेचे आहे. याबाबत आज प्रत्येकांना जनजागृती करणे आवश्यक आहे. आजच्या घडीला प्रत्येक तालुक्यात पाण्याची कमतरता भासत आहे. म्हादईचे पाणी बंद झाल्यास काय होईल याचा विचार करणेही कठीण आहे. असेही मनोज परब म्हणाले.
सरकार जनतेला मुर्ख बनवत आहे. असे सांताना मनोज परब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमति शहासह भाजप नेत्यांवर खरपूस टीका केली आहे. भाजपचे नेते कर्नाटकात एक सांगतात तर गोव्यात दुसरेच सांगतात खोटारडे पणाचा कळस करतात. कॉग्रेसही तोच कित्ता गिरवत आहे. कँग्रेसचे गोव्यातील नेते म्हादई वाचविण्यासाठी जागोर करण्याच भाषा करीत आहेत तर केंद्रीय नेते कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आल्यास म्हादईचे पाणी देण्याची भाषा करीत आहे. आपचेही तेच नाटक सुरु आहे. म्हादई कर्नाटकाला देण्याचे कारस्थान स्व. मनोहर पर्रीकर सरकार सत्तेत असताना पासून सुरु आहे. असेही मनोज परब यांनी सांगितले. गोवा फॉरर्वडेच विजय सरदेसाई भाजप सरकारात असताना म्हादई बाबत एकाही शब्द बोलत नव्हेत आता मात्र म्हादईसाठी लढा देण्याची वल्गना करीत आहेत. एकंदरीत सर्व राजकारणी गोमंतकीयांना गृहीत धरून आपल्याला पायद्यासाठी वावरत आहेत. आज जनतेने या राजकारण्यांना धडा शिकविणे आवश्यक आहे असेही मनोज परब म्हणाले.
यावेळी आमदार विरेश बोरकर म्हणाले की सरकारने म्हादईच्या नावाने कर्नाटकातील विदानसभा तसेच लोकसबा निवडणूकीचा प्रचार सुरु केला आहे. म्हादई वाचविणे हा प्रश्न केवळ आमदारांचा नाही तर राज्यातील प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेणे जरूरीचे आहे.
येथील आझाद मैदानावर जालेल्या जाहिर सभेत सुमारे अडीज हजाराहून अधिक लोक उपस्थित होते. कडक पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवला होता. यावेळी प्रेमानंद गावडे, मनीला शिरोडकर यांनीही समयोजित विचार मांडले. विश्वेश नाईक यांनी म्हादई बचाव जाहिरनामा वाचून दाखविला.









