बेळगाव – सर्व शेतकऱ्यांची समस्या असल्यास यडवाल शिवारातील महत्त्वाच्या कच्च्या संपर्क रस्त्याचे विकास काम तत्काळ युद्ध पातळीवर हाती घेण्यात येईल असे आश्वासन बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेलके यांनी दिले आहे. अलारवाड क्रॉस नजीक असलेल्या यडवाल शिवारातील कच्च्या रस्त्याला भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. सदर शिवारात शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या सोमवारी आमदार अनिल बेनके यांची भेट घेऊन आपल्या शिवारातील सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतराच्या कच्च्या संपर्क रस्त्याचे डांबरीकरण अथवा कॉंक्रिटीकरण करावे अशी मागणी केली होती. तसेच आपल्या मागणीचे निवेदन आमदारांना सादर केले होते. त्यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार आमदार अनिल बेनके यांनी आज बुधवारी दुपारी यडवाल शिवाराला भेट देऊन तेथील कच्च्या संपर्क रस्त्याची पाहणी केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









