बेळगाव प्रतिनिधी कडोली येथील वैजनाथ गल्ली गेली कित्येक वर्षे रस्ता,गटारी,पिण्याचे पाणी,गल्लीतील विद्युत दिवे अशा विविध समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. शिवाय जलजिवन पिण्याच्या पाण्यासाठी रस्ता फोडुन जलवाहीनी घालुन त्यावर कांक्रेट घातल्यानंतर तर समस्येत अनखीनच भर पडली असुन वाहणे अडकण्यासह विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असुन कित्येक वर्षे झाली इतकी मोठी गंभीर समस्या आहे.
वैजनाथ गल्ली ही गावची एक अत्यंत मुख्य गल्ली असुन अंगणवाड्या,मराठी,कन्नड व उर्दू प्राथमिक शाळा,मराठी शिवाजी हायस्कूल,कन्नड सरकारी हायस्कूल,कालेज,सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र,पशु आरोग्य केंद्र,टेलीफोन एक्चेंज आफिससह सर्व सरकारी कार्यालये,गावचा अत्यंत जागृत व पुरातन ग्राम देवता श्री कल्मेश्वर पालखीसह सर्व धार्मिक विधी कार्यायांना या गल्लीतुनच जाणे येणे असते शिवाय अंबेवाडी व अगसगा भागातील हायवेला जोडणारा हा संपर्क रस्ता व माळराणावरील शेतिवाड्यालाही जाणाराही मुख्य रस्ता असल्याने रोज शेकडो वाहणांची वर्दळही असते तरी गेल्या पाचवर्षापुर्वि सुमारे चाळीस लाख खर्चुन आमदार सतिश जारकिहोळी यांच्या फंडातुन रस्ता करण्यात आला होता. परंतु कांटॅक्टरने अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता केल्याने केवळ सहाच महिण्यात संपुर्ण खडिच उकडून सर्वत्र खडीविकुरली, त्यानंतर लागलीच डागडुजी करुन त्यावर डांबरीकरणही करण्यात आले, परंतु गल्ली उतार असल्याने माळराणावरील सर्व पाणी गल्लीतुन येऊन लोकांच्या घरामध्येही शिरत असुन काही लोकांची घरे कोसळली आहेत, तर काही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. तसेच गल्लीतील बहुतेक लोकांना पाण्यासाठी कसरत करावी लागते तर काही मोजकीच लोकं पाण्याची चोरी करत असुन तशा लोकांना ग्राम पंचायत सदस्य साथ देत आहेत.शिवाय गल्लीतील विद्युत दिवे केंव्हाही पेठतात तर जेंव्हा गरज असते तेंव्हा मात्र बंध असतात.तसेच जलजिवन पिण्याच्या पाण्यासाठी रस्ता फोडुन जलवाहीनी घालुन त्यावर कांक्रेट घातल्यानंतर तर समस्यांमध्ये अनखिन भर पडली असुन वैजनाथ गल्ली संपुर्ण समस्यांच्या विळख्यात सापडली असुन वारंवार ग्राम पंचायतीला कळवून देखील उडवाउडविची उत्तरे देत आहेत तरी तातडीने गल्लीतील सर्व समस्या सोडविल्या नाहीत तर पंचायतीलाच टाळे ठोकण्याचा इशारा गल्लीतील नागरिकांनी दिला आहे.
Previous Articleशाहीर साबळेंच्या ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ गीताला राज्यगीताचा दर्जा मिळणार, मुनगंटीवारांची माहिती
Next Article समता पक्षाची याचिका हायकोर्टाने फेटाळली