If the officers on patrol do not listen, take action – Babi Jogi
मालवण / प्रतिनिधी-
गस्तीला जाणाऱ्या अधिकाऱ्यांकडून जर सहाय्यक मत्स्य आयुक्तांच्या सूचनांचे पालन होत नसेल तर अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी केली आहे. तळाशील कवडा रॉकजवळील समुद्रात पर्ससीन ट्रॉलर्सनी शनिवारी सायंकाळी केलेल्या बेकायदेशीर मासेमारीच्या पार्श्वभूमीवर जोगी यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त रवींद्र मालवणकर यांना संपर्क केला होता. त्यावेळी मालवणकर यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी आपण सदरची मागणी केल्याचे जोगी यांनी सांगितले.









