If the number of Marathi schools is to be maintained, the people of the village should take the initiative – Ad Suhas Sawant
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेत शिकलेला विद्यार्थी हा इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकून इंग्रजी येणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा तो स्पर्धा परीक्षा ,नोकर भरतीमध्ये चमक दाखवत आहे. त्यामुळे आपला पाल्य मराठी शाळेत शिकत आहे याचा कमीपणा मानू नका . कलंबिस्त गाव हा सैनिकी परंपरा लाभलेले गाव आणि सैनिकी निर्माण करणारे गाव आहे . येत्या काळात या गावातील एक तरी व्यक्ती देशाचा लष्कर प्रमुख पदापर्यंत पोहोचावा अशी गुणवत्ता या गावात आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी चेअरमन तथा शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांनी केले. यावेळी गावातील जिल्हा परिषद च्या मराठी प्राथमिक शाळांची पटसंख्या टिकवण्यासाठी गावातील व्यक्तीनेच आता पुढाकार घेऊन उपक्रम हाती घ्यावेत असे अखिल मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष ॲड सुहास सावंत व उद्योजक तथा सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी कळसुलकर हायस्कूलचे अध्यक्ष शैलेश पई यांनी सुचित केले. कलंबिस्त येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम झाला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सतीश सावंत ,अखिल मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड सुहास सावंत, अध्यक्षस्थानी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी कळसुलकर हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई, शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा माजी प.स. सदस्य रुपेश राऊळ, सरपंच सपना सावंत उपसरपंच सुरेश पास्ते, ॲड सौ नीलांगी सावंत, सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष कॅप्टन दिनानाथ सावंत, ज्येष्ठ गावकर धोंडी सावंत ,कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे तालुका अध्यक्ष तथा कलंबिस्त पंचकोशी दुग्ध संस्थेचे चेअरमन ॲड संतोष सावंत ,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सगुण पास्ते ,केंद्रप्रमुख गुंडू सावंत, म.ल देसाई ,सदस्य शेखर मेस्त्री दीपक जाधव ,हनुमंत पास्ते ,सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक माजी उपसरपंच प्रल्हाद तावडे ,व इतर मान्यवर उपस्थित होते . यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये यश मिळवले त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सावंतवाडी / प्रतिनिधी