ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर यांचे भाष्य
विशेष प्रतिनिधी/ नवी दिल्ली
जर ब्रिटीश भारतात आले नसते तर, देशात मराठ्यांचे राज्य आले असते, असे भाष्य काँग्र्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी एका मुलाखतीत केले आहे. शशी थरुर हे एक विचारवंत म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यावर त्यांचा अभ्यास चांगला आहे. त्याचप्रमाणे गेल्या दोनशे-तीनशे वर्षापूर्वीच्या इतिहासाचेही त्यांना आकलन आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवरायांचा इतिहास, त्यांची कामगिरी आणि त्याच ओघाने मराठा सरदारांची देशावर असलेली पकड याचे सांगोपांग विवेचन थरुर यांनी केले आहे. त्यानंतर वरील भाष्य केले. मोगल साम्राज्याला हादरा देण्याचे काम मराठा सरदारांनीच केले होते. दिल्लीचे सिंहासन त्यांनी हलवले होते. त्यामुळेच ब्रिटीश भारतात आले नसते तर मराठ्यांचेच राज्य आले असते, असे त्यांचे मत होते









