हैदराबाद :
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी पंतप्रधानपदी असते तर पीओकेवर भारताचे नियंत्रण असते, असा दावा रेड्डी यांनी केला. तसेच चार दिवसांच्या आत पाकिस्तानसोबत संघर्षविराम करण्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित करत या निर्णयाला ‘घाई’त घेण्यात आलेला ठरविले आहे.
राहुल गांधी पंतप्रधान असते तर आतापर्यंत पीओके भारताच्या ताब्यात आले असते. राहुल गांधींचे नेतृत्व हे 1971 च्या युद्धावेळी इंदिरा गांधींनी केलेल्या नेतृत्वाप्रमाणे असते. इंदिरा गांधींनी अमेरिकेला कठोर इशारा त्यावेळी दिला होता. आज भारताला अशाच कणखर नेतृत्वाची गरज असल्याचे उद्गार रेवंत रेड्डी यांनी काढले आहेत.
पाकिस्तानसोबत सैन्यसंघर्ष सुरू करण्यापूर्वी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक का बोलाविली होती, तर शेजारी देशासोबतचा सशस्त्र संघर्ष समाप्त करण्यापूर्वी मात्र त्यांनी असे केले नव्हते, असा दावा रेड्डी यांनी केला आहे.
140 कोटी भारतीयांच्या इच्छेनंतरही मोदी हे बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वतंत्र करणे आणि पाकव्याप्त काश्मीरवर नियंत्रण मिळविण्यास अपयशी ठरले आहेत. तेलंगणात निर्मित लढ्रा विमानांनी आमच्या देशाचा सन्मान कायम राखला. नरेंद्र मोदींकडून आणले गेलेल्या राफेल लढाऊ विमानांना पाकिस्तानने पाडविले आहे. किती राफेल विमाने कोसळली यावर कुठलीच चर्चा झालेली नाही. अलिकडच्या संघर्षात पाकिस्तानने कीत राफेल विमाने पाडविली याचे उत्तर नरेंद्र मोदींनी देणे गरजेचे असल्याचे रे•ाr यांनी म्हटले आहे.
राफेलशी निगडित हजारो कोटी रुपयांची कंत्राटं मोदींच्या निकटवर्तीयांना देण्यात आली होती. चार दिवसांच्या संघर्षानंतर कुणी कुणाला धमकाविले आणि कुणी कुणासमोर गुडघे टेकले हे आम्हाला माहित नाही. अचानक अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समोर आले आणि त्यांनी भारताला धमकावून युद्ध रोखल्याचा दावा केला असे रे•ाr यांनी म्हटले आहे.









