तळवडे येथील श्रावण मास भजन स्पर्धेचे थाटात झाले उद्घाटन
न्हावेली / वार्ताहर
गुरुचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यास शिष्य आपली कला योग्य प्रकारे विकसित करू शकतो शिष्याने पण गुरूच्या मार्गदर्शनाचा योग्य वापर करणे गरजेचे आहे ,असे मत सिंधुदुर्ग जिल्हा भजनी संघाचे अध्यक्ष बुवा भालचंद्र केळुसकर यांनी तळवडे येथे श्री सिद्धेश्वर उदीनाथ भजन मंडळ तळवडे व बाळू कांडरकर मित्र मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने श्रावण मास भजन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा हा कलाकारांची खाणं आहे. या जिल्ह्यात विविध क्षेत्रातील संगीत, भजन किंवा दशावतार चित्रकार, तसेच तसेच विविध कलेत आपल्या जिल्ह्यात चांगल्या दर्जाचे कलाकार आहेत .या जिल्ह्यातील कलाकाराने आपला वेगळा ठसा राज्यात निर्माण केला आहे .आजच्या युवा पिढीने पण त्यांचा आदर्श घेऊन आपली कला सातासमुद्रपार न्हावी व जिल्ह्याचे नाव नावलौकिक करावे असे मत यावेळी जिल्हा भजनी संघाचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर यांनी तळवडे येथे बोलताना आपले मत व्यक्त केले. जिल्ह्यामध्ये भजनी क्षेत्रात अनेक युवा कलाकार सध्या शिक्षण घेत आहे. त्यांनी आपली कला योग्य प्रकारे सादर केल्यास जिल्ह्याचे नाव मोठे होऊ शकते .गुरुचे योग्य मार्गदर्शन त्यांनी घेणे गरजेचे आहे. तळवडे येते आयोजित केलेले ही स्पर्धा तळवडे , मातोंड , होडावडे,पेंडूर ,निरवडे गाव मर्यादित आयोजित करण्यात आली होती, यावेळी 25 वर्षे वयोगटाखाली हे श्रावण मास भजन स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेला स्पर्धक संघाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम वेळी सिंधुदुर्ग जिल्हा भजनी संघाचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर भजनी बुवा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावंतवाडी तालुका कन्झुमर सोसायटी अध्यक्ष प्रमोद गावडे, संतोषी माता दशावता नाट्य मंडळाचे संचालक भास्कर वैद्य ,श्री श्यामसुंदर मालवणकर सर, उद्योजक बंड्या परब, राजाराम गावडे, रविंद्र परब,बाळु कांडरकर,तळवडे अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन विलास परब , दशरथ मल्हार, महेश वडाचेपाटकर , तळवडे देवस्थानचे प्रमुख मानकरी सुनील परब , पंढरी मांजरेकर, ,तळवडे विकास विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आप्पा परब , देवा काबळी,अंकुश गावडे ,अनिल जाधव ,नारायण आशियेकर, बाबल थळकर, सुरेश गावडे,संदेश चव्हाण,विलास नाईक,परीक्षक वैभव परब , परीक्षक अमेय गावडे, ,पत्रकार रामचंद्र कुडाळकर, राजन काष्टये, शिवप्रसाद परब, श्री सिद्धेश्वर ऊदिनाथ भजन मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बाळू कांडरकर मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या स्पर्धेला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात रसिक वर्ग यावेळी उपस्थित होते.