कोल्हापूर :
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे गेल्या महिन्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा बदला घेत भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून शौर्य गाजवत पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. या सैन्याच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज कोल्हापुरात भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.
ही पदयात्रा महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरु झाली. यामध्ये शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी “भारत माता की जय”, “वंदे मातरम”, “पाकिस्तानला नामोहरम करणाऱ्या भारतीय सैन्याचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, “पहलगाम येथील भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्याने जशास तसे प्रत्युत्तर देऊन संपूर्ण जगासमोर आपल्या शौर्याचे दर्शन घडवले. भविष्यात अशा प्रकारचा हल्ला पुन्हा झाला, तर भारतीय सैन्य तत्काळ प्रत्युत्तर देईलच. पण गरज भासली, तर प्रत्येक शिवसैनिकही सीमेवर जाऊन पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी तयार आहे.”
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगल साळोखे, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, गौरी माळदकर, पूजा पाटील, सुनिता भोपळे, पूजा कामते, उप जिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उदय भोसले, किशोर घाटगे, सुनील खोत, राहुल चव्हाण, कमलाकर जगदाळे, अश्विन शेळके, युवासेनेचे प्रसाद चव्हाण, पियुष चव्हाण, कुणाल शिंदे, अविनाश कामते, दादू शिंदे, सौरभ कुलकर्णी, फेरीवाले सेनेचे शहरप्रमुख अर्जुन आंबी, राजेंद्र जाधव, सचिन पाटील, कपिल नाळे, तन्वीर बेपारी, योगेश चौगले, कपिल सरनाईक, शुभम शिंदे, श्रीकांत मंडलिक, रिक्षा सेनेचे शहरप्रमुख राजू पवार, तसेच आसिफ मुल्लांनी, मंगेश चितारे, यशवंत माळकर, प्रदीप मोहिते, अजिंक्य शिदृक यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.








