ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पक्षाने संधी दिल्यास मनसेचा पहिला खासदार मीच असेन, असा विश्वास मनसेचे बारामती लोकसभा प्रमुख वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.
वसंत मोरे आज बारामती दौऱ्यावर होते. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने त्यांनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदारकीबद्दल सूचक वक्तव्य केलं. मला खासदार व्हायचं आहे. पुण्याचा खासदार होण्यासाठी मी इच्छूक आहे. माझ्या पक्षाने मला संधी दिल्यास या वर्षी महाराष्ट्रातील पहिला मनसे खासदार हा वसंत मोरे असेल, असं मला 100 टक्के वाटतं, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
आज पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंडला भेट देणार आहे. तिथे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करायच्या आहेत. त्यासाठी चाचपणी सुरू आहे. राज ठाकरे लवकरच बारामतीत कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.








