अजित पवार भाजपात गेले तर त्यांची अवस्था बिकट होईल तसेच भारतीय जनता पक्ष सोडून आलोय, माझी खासदारकीची अडीच वर्षे बाकी असताना खासदारकी सोडली आहे. त्यामुळे भाजपाचे लोक कसे आहेत, हे मला चांगले माहित आहे. असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी अजित पवार असा कोणताही निर्णय घेतील असे मला वाटत नाही ज्यामुळे भाजपला फायदा होईल असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार काही आमदारांना घेऊन भाजपाबरोबर जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना माध्यमांमध्ये ऊत आला आहे. या चर्चांवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही पत्रकारांनी अजित पवार यांच्या बंडखोरीबद्दल विचारले असता ते म्हणाले, “अजित पवार भाजपात गेले तर त्यांची काय अवस्था बिकट होईल. मी भाजपा सोडून कॉंग्रेसमध्ये आलोय, मी अडीच वर्षे बाकी असताना माझी खासदारकी सोडली आहे. भाजपाचे लोक कसे आहेत, हे मला चांगलेच माहित आहे.” असे ते म्हणाले.
अजित पवारांच्या भाजप प्रवेशाबद्दल बोलताना ते म्हणाले, मला वाटत नाही कि, भाजपला फायदा होईल असं कुठलेही पाऊल अजितदादा उचलणार नाहीत. तसेच ते भाजपमध्ये जातील असही काही वाटत नाही
पुढे बोलताना ते म्हणाले, “भाजपाचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, मी २०१७ मध्ये सांगितलं होतं की, ते देश बरबाद करायला निघाले आहेत. आज देशाच्या जनतेला जाणीव झाली आहे. मी तेव्हा जे वक्तव्य केलं होतं ते आज देशाची जनता भोगते आहे. भाजपा हा लोकशाहीविरोधी पक्ष आहे.” असंही पटोले म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “भाजपाच्या ‘ऑपरेशन लोटस’वर बोलताना “कमळ हा शब्द प्रेमाचा संदेश देणारा शब्द असून त्याचा अर्थ दुसऱ्यांची घरं तोडणारा होऊ शकत नाही. ईडी व सीबीआय ही दोन माकडं केंद्र सरकारने पोसली आहेत. याचा वापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचं काम भाजपचे सुरू आहे. ईडी- सीबीआयचा वापर करून लोकशाहीच्या सर्व यंत्रणांना दाबण्याचा प्रकार सुरू आहे. हे लपून राहिलेलं नाही, सर्व देशाला कळत आहे.” असे ते म्हणाले.








