वृत्तसंस्था / जम्मू
जम्मूमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला आहे. सोमवारी रात्री उशिरा जम्मूच्या नगरोटामध्ये आयईडी बॉम्ब मिळाला असून तो नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राहुल चरक यांनी दिली आहे.
महामार्गाच्या कडेला एक संशयास्पद वस्तू असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. यानंतर बॉम्ब निष्क्रीय करणाऱ्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. या सामग्रीच्या तपासणीत इम्प्रोवाइज्ड इक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (आयईडी) असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर पथकाने हा आयईडी निष्क्रीय केला आहे. याप्रकरणी तपास केला जात असल्याचे राहुल चरक यांनी सांगितले आहे.
यापूर्वी 14 ऑगस्ट रोजी बारामुल्ला जिल्ह्यात एक बेवारस बॅग मिळाली हीत. या बॅगेतही आयईडी पेरण्यात आला होता. हा आयईडी सैन्याने नष्ट करत हल्ल्याचा मोठा कट हाणून पाडला होता.









