बिजापूर :
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये आयईडी स्फोट झाला असून यात एका जवानाला हौतात्म्य आले आहे. तर तीन जवान जखमी झाले आहेत. हा आयईडी नक्षलवाद्यांनी पेरला होता असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. इंद्रावती नॅशनल पार्कच्या नजीक या आयईडीचा स्फोट झाला. राज्य पोलीस आणि डीआरजीच्या संयुक्त पथकाने नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतली होती. यादरम्यान नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीचा स्फोट झाला.









