मुंबई
नवीन व्यवसायाच्या विम्याच्याबाबतीत भारतातील सर्वात मोठी खाजगी जीवन विमा कंपनी आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्सने सर्व पात्र सहभागी विमाधारकांना आर्थिक वर्ष 2022 साठी 968.8 कोटी वार्षिक बोनस जाहीर केला आहे. बोनस पेमेंटचे हे सलग 16 वे वर्ष आहे आणि कंपनीचे आतापर्यंतचे सर्वोच्च असून आर्थिक वर्ष 2021 पेक्षा 12 टक्के बोनस जास्त आहे.
31 मार्च 2022 पर्यंतच्या लागू असलेल्या सर्व सहभागी विमा योजना हा वार्षिक बोनस प्राप्त करण्यास पात्र आहेत. हा बोनस विमाधारकांच्या फायद्यांमध्ये जोडला जाईल. जवळजवळ एक दशलक्ष सहभागी विमाधारकांना याचा फायदा होईल आणि ते त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याच्या जवळ जातील.









