ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आयसीआयसीआय बँकेचे गुजरातमध्ये असलेले मुख्यालय आता मुंबईत हलविण्यात येणार आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला आयसीआयसीआय बँकेने याबाबतची माहिती दिली आहे.
आयसीआयसीआय बँकेचे मुख्यालय गुजरातमधून मुंबईला आल्यावर ही बँक मुंबईत कॉर्पोरेट आयकर भरणार आहे. ज्यामुळे राज्यभरातून गोळा करण्यात आलेल्या केंद्रीय करात महाराष्ट्राचा वाटा वाढेल. मोठी कॉर्पोरेट कर्ज महाराष्ट्रात नोंदवली जाऊन त्या कर्जावरील मुद्रांक शुल्क देखील महाराष्ट्रात दिले जाईल. याव्यतिरिक्त, बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) आता मुंबईत भरल्या जातील.
बँकेचे भागधारक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात असल्याने, कार्यक्षमतेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बँक व्यवस्थापनाने म्हटले आहे. बँकेचे मुख्यालय गुजरातहून मुंबईला हलविण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आयसीआयसीआय बँकेला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.









