Reju Shetti News : भावनिक मुद्दे उपस्थित करून किंवा राजकीय स्टंट करून जनतेच्या मुलभूत प्रश्नावरून लक्ष विचलित करण थांबवा. तुमचा डाव लोकांच्या लक्षात आला आहे. विरोधीपक्ष तुमच्या डावाला बळी पडतील,जनता नाही.अजूनही वेळ गेली नाही, महागाई नियंत्रणात आणा अन्यथा जनता तुम्हाला सोडणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. आज इचलकरंजीत महागाई विरोधी जन आक्रोश मोर्चाच्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
वाढत्या महागाईच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीत जन आक्रोश मोर्चा काढत केंद्र आणि राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत मोर्चाला सुरुवात केली. या मोर्चाला इचलकरंजी येथील राजवाडा चौकातून सुरूवात झाली. हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला. भर उन्हात निघालेल्या मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेत. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला आहे.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गॅस, पट्रोल, रासायनिक खते यांचे दर गगनाला भिडले आहेत. सरकारचं याकडे लक्ष नाही. उगाच जनतेसोमर भावनिक मुद्दे उपस्थित करून महागाईवरून जनतेचं लक्ष विचलुत करण्याचा प्रयत्न केला जातोय. हे थांबवा अन्यथा जनता तुम्हाला सोडणार नाही असा इशारा यावेळी राजू शेट्टी यांनी दिला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








