इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरातील रस्त्यावरील स्पीड ब्रेकरमुळे दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे दुचाकीच्या पाठीमागे बसलेली महिला दुचाकीवरून उडून रस्त्यावर पडून जागीच ठार झाली. आक्काताई सुनिल खोत ( वय ४२, रा. गल्ली नंबर २, गुरुकन्नननगर, इचलकरंजी ) असे तिचे नाव आहे. हा अपघात सोमवारी दुपारी घडला असून, यांची शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.
मयत आक्काताई खोत आणि तिचे पती सुनिल खोत हे पती-पत्नी दुचाकीवरून शहरातील नातेवाईकांच्या घरी जात होते. यावेळी शहरामधील तीन बती चार रस्ता चौका लगत मुख्य रस्त्यावर उभारलेल्या स्पीड ब्रेकरवरुन खोत यांची दुचाकी उडाली. त्यामुळे दुचाकीच्या पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून रस्त्यावर जोरात पडल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे आयजीएमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
Previous Articleरत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर गजानन पाटील बिनविरोध
Next Article लढती बहुरंगी, झंझावात तिरंगीच









