प्रतिनिधी,इचलकरंजी
Ichalkaranji News : दुधगंगेच्या पाण्यासाठी इचलकरंजीकर एकवटल्याचे दिसून आले.क्रांती दिनी शहरवासीयांकडून मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.येथील जय सांगली नाका ते पोटफाडी चौकापर्यंत अशी सुमारे तीन किलोमीटर लांब मानवी साखळी पहावयास मिळाली.यात गट-तट विसरून पाण्यासाठी शहरातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.हातातील फलक आणि डोक्यावरील घागरी लक्ष वेधून घेत होते.
साखळी आंदोलन यशस्वी होण्यासाठी सांगली रोड परिसरातील नागरिकांनी एकत्र येत ठिकठिकाणी बैठका घेतल्या.यातून जनजागृती करण्यास सुरुवात केली. तसेच परिसरातील सर्व पक्षीय नेतेमंडळी,सामाजिक कार्यकर्त्यांनीही सुळकूड पाणी योजनेच्या समर्थनार्थ गट-तट व राजकारण बाजूला ठेवत एकीने पाण्यासाठी लढा देण्याचा संकल्प केला.आंदोलनात सुळकुड पाणी योजना कृती समितीचे सर्व सदस्य, सांगली रोड परिसर, सांगली नाका ते पोट फाडी चौक भागातील सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, लहान मुलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









