बेळगाव : के. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित राहुल के. आर. शेट्टी चषक वरिष्ठ फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातुन आयबीसिटी एफसीने रेग एफसीचा तर निपाणी युनायटेड एफसीने एफसीचा पराभव केला. अंकित माने व प्रशांत आजरेकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. लव्हडेल स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या राहुल के. आर. शेट्टी फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या दिवसी पहिल्या सामन्यात आयबीसिटी एफसीने रेग एफसीचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 14 व्या मिनिटाला आयबीसिटीच्या कर्णधार किरण चव्हाणने गोल करण्याची सुवर्ण संधी वाया घालविली. 22 व्या मिनीटाला रेग एफसीच्या शाहिमने मारलेला फटका गोलपोष्टला लागुन बाहेर गेला त्यामुळे पहिल्या सत्रात दोन्ही संघाचा गोल फलक कोराच राहिला. दसऱ्या सत्राात 45 व्या मिनिटाला आबीसिटीच्या आकाश देसाईने मारलेला फटका रेगच्या गोलरक्षकाने उत्कृष्ट अडविला. 62 व्या मिनिटाला आयबीसिटीच्या कर्णधार किरण चव्हाणच्या पासवर अंकित माने पहिला गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली.
64 व्या मिनिटाला रेग एफसीच्या बचाव फळीतील खेळाडूच्या हाताला लागल्याने पंचानी आयबीसिटीला पेनाल्टी बहाल केली त्याच फायदा कौशिक पाटीलने उठत गोलात रुपांतर करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात रेग एफसीला गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या सामन्यात निपाणी एफसीने साईराज एफसीचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 21 व्या मिनिटाला निपाणीच्या शुभम देसाईने गोल करण्याची संधी वाया घालविली. 25 व्या मिनिटाला साईराजच्या तुषार रेवणकरने मारेला फटका आयबीसिटीच्या गोलरक्षकाने उत्कृष्ट अडविला. त्यामुळे पहिल्या सत्रात गोल फलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 57 व्या मिनिटाला निपाणी एफसीच्या गुरू कुलकेकरच्या पासवर प्रशांत आजरेकरने पहिला गोल करून 1-0 ची आघाडा मिळवूत दिली. 62 व्या मिनिटाला निपाणीच्या प्रशांत आजरेकरने बचव फळीला चकवत दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. सामन्यानंतर रिजवान मुल्ला, चेतन कोठारी यांच्या हस्ते पहिल्या सामन्यातील सामनावीर अंकित माने व इम्पॅक्ट खेळाडू शाहिद, दुसऱ्या सामन्यात सामनावीर प्रशांत आजरेकर व इम्पॅक्ट खेळाडू तुषार रेवणकर (साईराज) यांना प्रमुख पाहुणे बसवराज राइयागोळ, डॉ. उमेश आचर्य यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.
शुक्रवारचे सामने : 1)ब्रदर्स एफसी वि. फॅन्को दुपारी 3 वा. 2) मजर युनायटेड वि. खानापुर 4.30 वा. 3) निपाणी वि. सिटी स्पोर्टस यांच्यात साय. 6. 4) आयबीसिटी वि. कगॅसमॅक्स यांच्यात 7,30









