नवी दिल्ली :
1989 च्या तुकडीचे हिमाचल प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी के. संजय मूर्ति यांची देशाचे नियंत्रक आणि महालेखापाल म्हणजेच कॅग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मूर्ति हे सध्या शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभागाचे सचिव आहेत. मूर्ति हे लवकरच कॅग म्हणून कार्यभार ग्रहण करणार आहेत. मूर्ति हे वर्तमान कॅग गिरीश चंद्र मुर्मू यांची जागा घेणार आहेत. मुर्मू यांना ऑगस्ट 2020 मध्ये कॅग नियुक्त करण्यात आले होते. त्यांचा कार्यकाळ 20 नोव्हेंबर रोजी समाप्त होणार आहे.









