जालन्यामध्ये राजकीय भूकंप
विधानसभेतील पराभावनंतर कॉंग्रेसच्या माजी आमदारांचे पक्षांतराचे संदेश
जालना
विधानसभेतील पराभवानंतर कॉंग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी खासदार कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यलयाच्या उद्घाटन प्रसंगी पक्षांतराचे संदेश दिले.
यावेळई गोरंट्याल म्हणाले, मी एकदा बोललो की बोललो, आता पाच वर्षे वाट बघणार नाही नाही. जालन्यामध्ये आपल्याच माणसांनी घात केल्याची खदखदही त्यांनी व्यक्त केली. यावेळी माझं झालं, तस २०२९ साली तुमचं होऊ नये म्हणून सांगतोय, असे म्हणत खासदार कल्याण काळे यांना गोरंट्याल यांनी पक्षांतराच सल्ला दिला.
विधानसभा २०२४ मध्ये कॉंग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा शिवसेना शिंदे गटाच्या अर्जून खोतकर यांनी पराभव केला. हा पराभव गोरंट्याल यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. दरम्यान गोरंट्याल यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत देत जालन्यात राजकिय भूकंप आणला आहे.
Previous Articleकेडीबीएतर्फे 13 जानेवारीला बॅडमिंटन संवाद कार्यक्रम
Next Article निम्म्या शहरात सोमवार, मंगळवारी पाणीबाणी








