ऑनलाईन टीम/तरुण भारत
NCP Rekha Taur on Abdul Sattar छ शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यांनतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून ठिकठिकणी निषेध करत अंडीलने करण्यात आली. तर राष्ट्रवादीच्या (NCP) काही नेत्यांकडून सत्तारांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यातच एका राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिकाऱ्याने सत्तारांचे कपडे फाडेल, त्यांना मी १० लाखांचे बक्षीस देईन, अशी ऑफर दिली आहे. (Ncp Leader Appeals I Will Give A Reward Of 10 Lakhs To Anyone Who Tears Abdul Sattar Clothes)
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द काढले. या वक्तव्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत सत्तारांचा निषेध केला. यांनतर या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अब्दुल सत्तार यांनी माफीही मागितली. पण अब्दुल सत्तारांच्या माफीनंतरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधातील आंदोलन कायम सुरू ठेवले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटित कामगार विभाग प्रदेश उपाध्यक्षा नेत्या रेखा तौर (Rekha Taur) यांनी “कृषिमंत्री अब्दुल सत्तार महाराष्ट्रात जिथं कुठं दौऱ्यावर असतील तिथं जावून कार्यकर्त्यांनी त्यांचे कपडे फाडावेत. त्याचे कपडे फाडणाऱ्याला मी स्वतः १० लाख रुपयांचे बक्षीस देईन”, असे आवाहन केले.
हे ही वाचा : काँग्रेसचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याच्या आदेशाला स्थगिती… भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल सुरूच राहणार
दरम्यान, रेखा तौर यांनी बोलताना अब्दुल सत्तारांनी जे बेताल वक्तव्य केले त्याचा मी जाहीर निषेध करते. त्यांनी सुप्रिया ताईंचाच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व महिलांचा अपमान केला आहे. तसेच महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना मी विनंती करते की, सत्तार जिथे कुठे दौऱ्यावर असतील, त्याचे कपडे फाडा. जे कुणी अब्दुल सत्तारांचे कपडे फाडेल, त्याला मी १० लाख रुपये बक्षीस देईन असे त्या म्हणाल्या.