काहीही झालं तरी मी केसरकरांचा प्रचार करणार नाही – राजन तेली
सावंतवाडी | प्रतिनिधी
भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात आपण मैदानात उतरणारच असे म्हणत पुन्हा एकदा निशाणा साधला आहे .केसरकरांनी मतदारसंघात पंधरा वर्षात काहीच केले नाही . त्यामुळे त्यांनी एक तरी असं काम केलं आहे का ते दाखवावे त्यांनी एकाच व्यासपीठावर आमने-सामने यावे असे मी त्यांना आवाहन करत आहे . काहीही झालं तरी मी केसरकरांचा प्रचार करणार नाही असेही ठणकावून सांगितले. श्री तेली शांत आहेत गप्प झाले ,असं बोललं जात आहे. त्यामुळे हा सस्पेन्स श्री तेली यांनी उघड करत मला कोणीही गप्प केलेला नाही. मी सत्य उघडपणे मांडतो. श्री केसरकर यांनी खासदार नारायण राणे यांना किती त्रास दिला आहे हे जनतेला माहित आहे. त्यामुळे केसरकर हे स्वार्थी व्यक्तिमत्त्व आहे. घोषणाबाज मंत्री आहेत असेही ते म्हणाले. राजन तेली यांच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष लागून राहिले होते. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले.