सांगरूळ / वार्ताहर –
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून बाजीराव खाडे यांनी तयारी सुरू केली आहे. कोल्हापूर मतदार संघातून जर काँग्रेस पक्षाचा खासदार झाला तर मला आनंद होईल.त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही करवीरचे आमदार पी. ए.न पाटील यांनी दिली.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांना उमेदवारी द्यावी या मागणीसाठी सांगरुळ परिसरातील पदाधिकाऱ्यांनी आमदार पी. एन. पाटील यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते .
यावेळी बोलताना करवीरच्या माजी सभापती सीमा चाबूक म्हणाल्या बाजीराव खाडे यांच्यासारखे अभ्यासू युवकांने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर काम करून वेगळी छाप पाडली आहे. काँग्रेसने त्यांना संधी दिली तर ते निश्चितच मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट करतील असा विश्वास व्यक्त केला. कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे विधानसभा व विधान परिषदेचे पाच आमदार आहेत.तसेच येथे महाविकास आघाडी भक्कम आहे ही जागा काँग्रेस पक्षाने घेऊन बाजीराव खाडे यांना संधी द्यावी अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने केली.
यावर बोलताना पी. एन. पाटील यांनी बाजीराव खाडे यांचे काम मी जवळून पाहिले आहे. त्यांच्या उमेदवारीसाठी असणाऱ्या शिष्टमंडळात आपण पुढे राहू अशी ग्वाही दिली.
या शिष्टमंडळात सांगरुळ शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक निवृती चाबूक, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, लोकनियुक्त सरपंच शितल खाडे ,माजी सभापती डॉ . अनिता जंगम ,उपसरपंच सुभाष सुतार ,कुंभीचे माजी संचालक भरत खाडे, करवीरच्या माजी सदस्या अर्चना खाडे, पांडुरंग सेवा संस्थेचे चेअरमन सतीश तोरस्कार , विठ्ठल घोलपे प्रा. तुकाराम जंगम प्रा. गजानन खाडे, कोजिमाशि पत संस्थेचे माजी चेअरमन कैलास सुतार,माजी सरपंच गजानन परीट ,निशिकांत खाडे,सुनील कापडे, दत्तात्रय बोळावे, पी. डी. खाडे यांचे सह ग्रामपंचायत व सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते .
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









