वृत्तसंस्था/ लुधियाना
2023 च्या हंगामातील आय लिग फुटबॉल स्पर्धेतील सोमवारी येथील नामधारी स्टेडियमवर खेळविण्यात आलेला दिल्ली एफसी आणि ट्रेयू एफसी यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला.
या सामन्यात 29 व्या मिनिटाला ट्रेयू एफसीचे खाते लिटॉन शिलने केला. मध्यंतरापर्यंत ट्रेयू एफसीने दिल्लीवर 1-0 अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला आघाडी फळीतील बलवंतसिंगने दिल्ली एफसी संघाला बरोबरी साधून दिली. यानंतर दोन्ही संघांनी निर्णायक गोल नोंदविण्याचा प्रयत्न केला. पण बचावफळी व गोलरक्षकाच्या कामगिरीमुळे हा सामना अखेर बरोबरीत राहिला.









