५ वर्षांपूर्वी २०१८ साली झालेल्यात निवडणुकीदरम्यान दिलेली सर्व आश्वासने ९८% पूर्ण करण्यात आले असून,मात्र मी विरोधी पक्षात राहिल्याने २ आश्वासने बाकी राहिले आहेत. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला सत्तारूढ करून त्या उर्वरित आश्वासने पूर्ण करण्याची संधी मला देण्याचे आवाहन बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी के परिसरात त्यांचा प्रचार दौरा झाला. यावेळी त्या बोलत होत्या. रस्ता विकास, पेयजल, शाळा, मंदिर, समुदाय भवन असे विविध मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत यासह आता कॉलेज व इस्पितळ बांधण्याचे ध्येय आहे.
आपण विरोधी पक्षात असल्याने या संकल्पनेला अडथळा आला होता. पाटबंधारे, लघु पाटबंधारे, पदवीपूर्व शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्यमंत्री परिहार निधी, कन्नड व संस्कृती विभाग, पर्यटन विभाग, आमदारनिधी, मागासवर्ग विकास विभाग, ग्रामीण विकास विभाग, धर्मदायी विभाग असे सर्व विभागातून हजारो करोड रुपये विशेष निधी मंजूर करून ग्रामीण मतदारसंघाचा विकास साधल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. याप्रसंगी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.