के-ड्रामा पाहून प्रेम मिळविण्यासाठी कोरियात पोहोचली महिला
कोरियन ड्रामाची जादू पूर्ण जगावर चालत आहे. या ड्रामांच्या कहाण्या, रोमान्स, इमोशनल ट्विस्ट आणि सर्वात आवश्यक सुंदर चेहरे यामुळे लोकांच्या मनात स्थान मिळविले आहे. के-ड्रामाच्या जगाने लाखो लोकांना दक्षिण कोरियाशी जोडले आहे. तेथील गल्ल्यांमध्ये देखील के-ड्रामाप्रमाणेच जादू दिसून येईल अशी अपेक्षा लोक करू लागले आहेत. परंतु जेव्हा वस्तुस्थितीला सामोरे जावे लागते, तेव्हा कल्पनेपेक्षा ते किती वेगळे असते याचे नवे उदाहरण समोर आले आहे.
स्वप्नांचा रोमांस, तुटला भ्रम
अमेरिकेच्या एका महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. के-ड्रामा स्टाइल बॉयफ्रेंड मिळविण्याचे स्वप्न घेऊन ही महिला दक्षिण कोरियात पोहोचली, परंतु तेथे तिने जे पाहिले, ते पाहून तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. तिने स्वत:च्या या प्रवासाच्या अनुभवाला एका व्हिडिओद्वारे शेअर केले आहे. व्हिडिओच्या प्रारंभी ती अत्यंत आनंदी दिसून येते. फ्लाइटमध्ये बसल्यावर ती सोशल येथे एका हँडसम कोरियन युवकाशी प्रेम करण्यासाठी जात असल्याचे सांगताना दिसून येते. परंतु कोरियाच्या रस्त्यांवर पोहोचताच तिचा उत्साह क्षणार्धात मावळतो.
व्हिडिओच्या पुढील सीनमध्ये महिला सोलच्या गल्ल्यांमध्ये फिरताना दिसून येते आणि तेथे असलेल्या कोरियन युवकांच्या चेहऱ्यांना झूम करून दाखविते. बॅकग्राउंडमध्ये ‘टायटॅनिक’ चित्रपटाचे ट्रॅजिक म्युझिक ऐकू येते. ती कॅमेरा वळवून एक रँडम इसमाला दाखविते, जो तिचे कृत्य पाहून चकित होतो आणि अखेरच्या दृश्यात निराशाग्रस्त झालेली महिला माझी फसवणूक झाली असून हे अत्यंत डिस्टर्बिंग आहे, मी येथून त्वरित जाऊ इच्छिते असे म्हणताना दिसून येते.
सोशल मीडियावर गदारोळ
महिलेच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक रिअॅक्शन दिसून आल्या. काही लोकांनी याला हसून टाळले, तर काहींनी महिलेच्या मानसिकतेवर टीका केली आहे. फिल्टर हटवा आणि खरे जग पहा, प्रत्येक चेहरा कुठल्याही के-ढजमा स्टारसारखा नसतो असे एका युजरने तिला सुनावले. तर अन्य संस्कृतींचा आदर करणे शिका, प्रत्येक जण तुमची फँटसी पूर्ण करण्यासाठी जन्माला आलेला नाही अशी प्रतिक्रिया अन्य युजरने व्यक्त केली आहे.









