मिळालेल्या खात्याला न्याय देणार : रमेश तवडकर
पणजी : मंत्रीपद मागितले नाही तर खाते तरी कशाला मागू ? अशी प्रतिक्रिया मंत्रिपदाची शपथ घेतलेले माजी सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केली. जी खाती मिळतील त्या खात्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. तवडकर यांच्यासोबतच आमदार दिगंबर कामत यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांना अद्याप खाती देण्यात आलेली नाहीत. ती काल सोमवारी मिळतील अशी आशा होती. परंतु ती मिळाली नाहीत. आता बहुतेक गणेशचतुर्थीनंतच खाती मिळतील, असा अंदाज आहे. दोन्ही मंत्र्यांना खाती कोणती मिळणार याची उत्सुकता असून त्यांचे कार्यकर्ते प्रतीक्षेत आहेत.









