मडगावात प्रदर्शन व मान्यवरांचा सत्कार
प्रतिनिधी /मडगाव
‘वर्ल्ड वाईड विस्डमस् विंडो’ या संस्थेतर्फे विविध क्षेत्रांत समाज कार्य करणाऱया अपेक्षित समाजकार्य करत्याचा दरवर्षी 23 जानेवारी रोजी ‘भारत भूमीच्या तळपता सूर्य’ नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त सत्कार करण्यात येतो. कोविड महामारी पुढे ढकलण्यात आलेला कार्यक्रम दि. 2 जून 2022 रोजी 11 वाजता खालील मान्यवराच्या उपस्थितीत साजरा होणार.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फातोर्डाचे आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई तसेच अध्यक्षस्थानी दै. तरूण भारतचे गोवा आवृत्ती संपादक सागर जावडेकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी खालील मान्यवरांचा सत्कार पाहुण्याच्या हस्ते केला जाणार आहे. रामदास वासुदेव केळकर (माजी प्राचार्य सप्तेश्वर हायर सेकेंडरी स्कुल, मांद्रे-पेडणे), विनोद प्रभाकर जांबावलीकर (माजी सुपरवाईझर सार्वजनिक बांधकाम खाते, केपे.), कृष्णानंद नारायण भट (समाज सेवक, बोर्डा-मडगाव), शैलेशचंद्र पंढरीनाथ रायकर (माजी न्यूज रिडर, गोवा आकाशवाणी पणजी, तथा लेखक व माजी शिक्षक), श्रीमती गायत्री लवु राऊत देसाई (सहाय्यक शिक्षिका सरकारी माध्यमिक विद्यालय, मळकर्णे-सांगे), राजेश बबन नाईक (वाहतूक खात्याचे सहाय्यक संचालक, वास्को).
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण तरूण भारतवर प्रदर्शन. ‘मी 103 वर्षांचा तरूण भारत बोलतोंय’, ‘कात्रणातून’ साकारला, आकारला तरूण भारत. विविध अंगी, विविध ढंगी, विचार, आचार, ज्ञानपान, विविध रंगी….कात्रणातून विविध पुस्तिका (मिनी तरूण भारत) तयार करण्यात आला आहे.
1) गोव्याची फुले, फळे व भाज्या. 2)गोव्याची देवता, देव, देवळे व देवस्थाने. 3) तरूण भारतातली निरनिराळी ‘आगळी’, ‘वेगळी’ मुखपृष्ठे. 4) तरूणातून ‘तरूणाई दर्शन’. 5) खजानाच्या अंतरी ‘अनंत खजाने’. 6) ‘सावधान’ लपून वाचाल तरच वाचा ‘चुटके’ चोर ‘लेले’. 7) बोध घ्यायचा असेल तरच वाचा ‘बोधकथा’. 8) आठ‘वडय़ा’तील अनेक अनोखी सदरें. 9) चित्र विचित्र, ‘जग दिसतं तस नसतं म्हणून माणूस फसतं’. 10) रेशमी चिमटे. शि. वि. (शिक्षक विद्यार्थी) शिक्षक ः बाळू तुला कोण काढतो चिमटे ? बाळू ः जगदशी कुंटे, सर. 11) 2017 ते 2021 पर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवातील गोव्यातील ‘मंगलमूर्ती’ मोरया दर्शन. 12) ‘फिरकी’ मारयाला शिका ‘काशी’. 13) स.वा.के च करिअर मार्गदर्शन ः प्राचार्य रामदास वासुदेव केळकर.
तरूण भारतच्या विविध अंगी, विविध ढंगी कात्रणाचा संग्राहक व रचनाकृतीकार नवनाथ रामचंद्र नेरूरकर यांनी कोविड काळांत केलेला हा प्रकल्प दि. 2 जून ते 3 जून पर्यंत संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले असणार. सर्वांनी त्यांच्या निवासस्थानी भेट द्यावी व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे. हे प्रदर्शन ः ‘निसर्ग’ 2993 सी. डी. फ्लावर व्हेली, बोर्डा-मडगाव येथे खुले असेल. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9226718159 वर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.








