मी कॉंग्रेसचाच फॉर्म भरला होता. माझा एबी भरण्यास विलंब झाला त्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरला. मला 100 पेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मी अपक्ष उमेदवार आहे अपक्षच राहीन राहीन अशी प्रतिक्रिया सत्यजीत तांबे यांनी माध्यमांना दिली. नाशिक पदवीधर निवडणूकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक अर्ज भरला.त्यांच्या या भूमिकेनंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबीत केले.त्याच सत्यजित तांबे यांनी काही वेळापूर्वी नाशिक पदवीधर निवडणूसाठीचे मतदान केले.त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जे राजकारण झालं ज्यातून माझ्या परिवाराला आपोरीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्धसत्य समोर ठेवून काही लोकांनी एकच बाजू मांडली. आम्ही मुद्दाम काही प्रतिक्रिया दिली नाही. कारण ज्या पक्षामध्ये आम्ही इतक वर्ष राहिलो. त्या पक्षाला शब्दाने गालबोट लागू नये. मात्र वेळ आली की आम्ही उत्तर देवू असे असा इशाराही त्यांनी दिला.
माझ्या वडिलांनी गेली 14 वर्षे या जिल्ह्यांमध्ये काम केलं. येथील मतदारांशी ऋणानुबंध निर्माण केले. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाल्याची दिसून येत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते माझ्यासोबत दिसून येत आहेत. सर्व पक्षांचे कार्यकर्ते भेदाभेद विसरून माझ्यासोबत दिसून येत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








