किंमत 6 लाखापुढे ः विविध वैशिष्टय़ांचा समावेश
नवी दिल्ली
ग्रँड आय 10 ही नवी गाडी नुकतीच कंपनीने दाखल केल्यानंतर सोमवारी आपली नवी ऑरा ही आणखी एक गाडी बाजारात सादर केली आहे. सदरच्या गाडीची किंमत 6.29 लाखापासून सुरु असणार आहे.
हय़ुंडाई ऑराची सुधारीत आवृत्ती लाँच करण्यात आली असून सुरुवातीची किंमत (एक्सशोरुम-दिल्ली) 6.29 लाख रुपये असणार असून यातील टॉप व्हेरियंट प्रकारातील गाडीची किंमत 8.57 लाख रुपये राहणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 30 सुरक्षिततेचे पर्याय या गाडीत देण्यात आल्याचे कंपनीने म्हटले असून 4 किंवा 6 बॅग्जचा पर्याय कारमध्ये देण्यात आला आहे.
कुणाशी करणार स्पर्धा
सदरची गाडी पेट्रोल आणि सीएनजी इंधनाच्या पर्यायासह येणार असून मारुती सुझुकीच्या डिझाइर, होंडा अमेझ आणि टाटा टिगोर यांच्याशी ती स्पर्धा करेल.
सहा रंगात उपलब्ध- पोलर व्हाइट, टायटन ग्रे, टायफुन सिल्वर, स्टारी नाइट, टील ब्ल्यू व फीयरी रेड
सुरक्षिततेसाठी- 6 एअरबॅग्ज, टायर मॉनिटरिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलीटी कंट्रोल, व्हेईकल स्टेबिलीटी मॅनेजमेंट, ऑटोमेटीक हेडलॅम्पस









