इलेक्ट्रीक वाहनांचे योगदान वाढवणार : पुढील वर्षी हायब्रिड कार येणार
वृत्तसंस्था/ मुंबई
दक्षिण कोरियातील प्रमुख वाहन कंपनी ह्युंडाई मोटर यांनी 2030 पर्यंत 55 लाख जागतिक स्तरावर वाहनांच्या विक्रीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. सर्व वाहन प्रकारांमध्ये पाहता 2030 पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा 60 टक्केपर्यंत असणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
देशांतर्गत पुरवठा साखळीच्या वापरातून डिझाईन करण्यात आलेल्या पहिल्या ईव्हीचे सादरीकरण लवकरच कंपनी करणार आहे. 2030 पर्यंत पाहता 55.5 लाख जागतिक स्तरावर वाहन विक्री साध्य करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. उत्तर अमेरिका, युरोप आणि कोरिया यासारख्या देशांमध्ये कंपनीच्या वाहनांना प्रतिसाद मिळण्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे. 55.5 लाख पैकी इलेक्ट्रीक वाहनांचा विक्रीतील वाटा 60 टक्के म्हणजे जवळपास 33 लाखाइतका असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारतातही 12 लाख वाहनांच्या विक्रीसाठी 2030 पर्यंतची योजना बनवण्यात आली आहे. यापैकी 2 लाख 50
2026 मध्ये हायब्रिड कार
हजार वाहनांची निर्यात ही पुण्यामधील कंपनीच्या कारखान्यातून केली जाते. 2030 पर्यंत 18 पेक्षा अधिक कार मॉडल्स ही हायब्रीड श्रेणीवर आधारित सादर केली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट करत यासंदर्भात पुढील वर्षी म्हणजेच 2026 मध्ये जेनेसिस हायब्रीड मॉडेल आपले योगदान देण्यासाठी सज्ज होणार असल्याचे म्हटले आहे.









