परवडणाऱ्या किंमतीत होणार उपलब्ध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या काही महिन्यांमध्ये सुव्ह गटातील कार्सची वाढती मागणी लक्षात घेऊन ह्युंडाई कंपनीही यामध्ये सक्रीयपणे सहभागी होत आहे. आगामी काळासाठी आपली नवी कार उतरविण्यासाठी कंपनी सज्ज झाली आहे. कंपनीने नव्या सुव्ह गटातील कारचे नाव ‘एक्स्टर’ असे निश्चित केले आहे. या संदर्भात कंपनीने नावाबाबत अधिकृतपणे माहिती दिली आहे.

ही नवी गाडी बाजारात टाटा पंच हिला टक्कर देईल असे सांगितले जात आहे. अलीकडच्या काळामध्ये ह्युंडाईने वेन्यु, क्रेटा, अल्काझार, कोना इलेक्ट्रिक आणि आयोनी फाईव्ह या कार्स याच गटामध्ये दाखल केलेल्या आहेत.
काय म्हणाले सीओओ
कंपनीचे सीओओ तरुण गर्ग यांनी नव्या एक्स्टर गाडीची घोषणा करत नव्या ग्राहकांना ही गाडी आवडणार असल्याचे मत व्यक्त केले. कंपनीचे हे आठवे मॉडेल सुव्ह गटातील सादर करण्यात येत असून ग्राहक आणि कुटुंबीयांना ही गाडी निश्चितच पसंद पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
किती असेल किंमत
सदरच्या गाडीची किमत ही 5 लाख रुपयांच्या घरात असणार असल्याची माहिती आहे. सध्याला ही गाडी पेट्रोल इंधनावरच सादर केली जाणार असून 8.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन याला असेल.









