शिखांमध्ये सर्वात अधिक प्रमाण ः आरोग्य मंत्रालयाच्या सर्वेक्षणात खुलासा : हायपरटेंशनमुळे आजारांचा धोका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात शीख समुदायाचे लोक सर्वाधिक तर मुस्लीम सर्वात कमी प्रमाणत हायपरटेंशनने (उच्च रक्तदाब) ग्रस्त आहेत. उच्च रक्तदाबाचे मोठे कारण तणाव असल्याचे डॉक्टरांचे मानणे आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 च्या नव्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
या अहवालानुसार देशात 24 टक्के पुरुष आणि 21 टक्के महिला उच्चरक्तदाबाने ग्रस्त आहेत. यात शीख धर्माचे सर्वाधिक 37 टक्के, जैन धर्माचे 30.1 टक्के, हिंदूधर्मीय 24 टक्के आणि मुस्लीम धर्मातील 21 टक्के पुरुष सामील आहेत.
ज्या धर्माच्या लोकांमध्ये उच्च रक्तदाब असण्याचे प्रमाण कमी आहे, त्यांच्यामध्ये इतराच्या तुलनेत कमी आजारांची भीती आहे. उच्च रक्तदाबामुळे हृदयसंबंधित आजार, अर्धांगवायू, किडनी, लिव्हरला नुकसान पोहोचणे, नाकातून रक्त वाहणे, दृष्टीक्षमता कमी होणे किंवा संपणे यासारख्या आजारांचा धोका अनेक पटीने वाढत असतो. सर्वेक्षणानुसार गंभीर आजारांचा धोका असूनही देशात 67 टक्के महिला आणि 53.7 टक्के पुरुषांनी कधीच रक्तदाबाची तपासणी करविलेली नाही.
70 हून अधिक वयाच्या लोकांमध्ये समस्या
पन्नाशी ओलांडल्यावर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये उच्च रक्तदाब वाढू लागतो. 49 वर्षांच्या वयापर्यंत पुरुषांमध्ये हायपरटेन्शन अधिक असते. 30-39 वयोगटातील पुरुषांच्या तुलनेत सुमारे 7 टक्के अधिक महिला उच्च रक्तदाबाने ग्रस्त असतात. तर 70 हून अधिक वयोगटात हे प्रमाण याच्या उलट असते.
पंजाबनंतर केरळमध्ये सर्वाधिक 30.9 टक्के महिलांमध्ये उच्चरक्तदाबाची समस्या आहे. याव्यतिरिक्त कुठल्याही राज्यात हे प्रमाण 30 टक्क्यांपेक्षा अधिक नाही. सिक्कीमध्ये सर्वाधिक 41.6 टक्के पुरुष उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत. या यादीत पंजाब (37.7 टक्के) दुसऱया तर मणिपूर (33.2 टक्के) तिसऱया आणि अरुणाचल (33.1 टक्के) चौथ्या व केरळ (32.8 टक्के) पाचव्या स्थानावर आहे.
महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक
धर्म पुरुष महिला
हिंदू 24 21
मुस्लीम 21.2 20.7
ख्रिश्चन 29 26.3
शीख 37 30.8
बौद्ध 23.7 22.9
जैन 30.1 24.7
इतर 23 19.8
राज्यनिहाय उच्च रक्तदाबाची समस्या
राज्य पुरुष महिला
पंजाब 37 31.2
दिल्ली 32.7 24.1
छत्तीसगड 27.7 25
हरियाणा 25.1 21
महाराष्ट्र 24.4 23.1
मध्यप्रदेश 22.7 20.6
झारखंड 22.6 17.8
गुजरात 20.3 20.5
बिहार 18.4 15.9
राजस्थान 17.9 15.3









