पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली हायड्रोजनचा पर्वत आहे. याचा किंचित वापर केला तरीही 200 वर्षापर्यंत जीवाश्म इंधनाची गरज भासणार नसल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली सुमारे 6.3 लाख कोटी टन हायड्रोजन उपलब्ध आहे. हे दगड अन् भूमिगत रिजरवॉयरमध्ये आहे.
हा हायड्रोजन पृथ्वीवर असलेल्या कच्च्या तेलापेक्षा 26 पट अधिक आहे. परंतु या हायड्रोजनच्या अचूक लोकेशनचा अद्याप शोध लागलेला नाही. परंतु तो समुद्रात किंवा समुद्र किनाऱ्यापासून खूप दूर असल्याचे कळले आहे. हायड्रोजन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. हा स्वच्छ ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे. विशेषकरून गाड्या चालविण्यास उपयुक्त ठरणार आहे. हा वायू वीज निर्माण करू शकतो. हायड्रोजनच्या या मोठ्या साठ्यापैकी केवळ 2 टक्के हिस्सा म्हणजेच 124 कोटी टन पूर्ण जगाला शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करवून देऊ शकतो आणि ते देखील 200 वर्षांपर्यंत, अशी माहिती युएसजीएसचे पेट्रोलियम जियोकेमिस्ट ज्योफ्री एलिस यांनी दिली आहे.
जीवाश्म इंधनाच्या तुलनेत हायड्रोजनच्या प्रमाणातून दुप्पट ऊर्जा प्राप्त होते अशी माहिती जियोलॉजिस्ट सारा जेलमॅन यांनी सांगितले. सारा आणि ज्योफ्री यांचे अध्ययन अलिकडेच प्रकाशित झाले आहे.
दगडांच्या दरम्यान रासायनिक प्रक्रिया म्हणजे केमिकल रिअॅक्शनमुळे हायड्रोजन वायू तयार होत असतो. पाणी जेव्हा दोन हिस्स्यांमध्ये विभागले जाते, तेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायू निघतो. निसर्गात अनेक प्रक्रियांमुळे हायड्रोजन वायू निर्माण होतो, परंतु त्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. पश्चिम आफ्रिका आणि अल्बानियाच्या क्रोमियम खाणीत वैज्ञानिकांनी मोठ्या प्रमाणात हायड्रोजन वायू मिळाला होता, तेव्हापासून वैज्ञानिक पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली हायड्रोजनचा शोध घेण्यासाठी अध्ययन करत होते.









