ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Hybrid terrorist Imran Ghani killed in Shopian जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात दहशतवादी इम्रान बशीर गनी मारला गेला. तो लष्कर-ए-तोयबाचा हायब्रीड दहशतवादी होता. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान दुसऱ्या दहशतवाद्याची गोळी लागून इम्रान गनी ठार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान गनी याने जम्मू-काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन मजूर ठार झाले होते. त्यानंतर नाकेबंदी करुन जम्मू-काश्मीर पोलिसांनी गनीला अटक केली होती. गनीने केलेल्या खुलाशांच्या आधारे छापेमारी करण्यात येत होती. त्या दरम्यान, शोपियानच्या नौगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. त्यावेळी दुसऱया दहशतवाद्याची गोळी लागून गनी ठार झाला.









