वृत्तसंस्था/ ताश्कंद
येथे सुरु असलेल्या विश्व मुष्ठीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा मुष्ठीयोद्धा मोहम्मद हुसामुद्दीनने 57 किलो वजन गटात उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवताना चीनच्या लियू पिंगचा एकतर्फी पराभव केला.
पुरुषांच्या 57 किलो वजन गटातील शुक्रवारी झालेल्या लढतीत हुसामुद्दीनने चीनच्या पिंगचा 5-0 अशा गुणाने एकतर्फी पराभव केला. आता हुसामुद्दीन आणि रशियाचा एदुआर्द यांच्यात रविवारी पुढील फेरीचा सामना होईल.









