वाकरे।प्रतिनिधी
Kolhapur Crime : दोनवडे ता करवीर येथे कौटुंबिक वादातून पतीने केलेल्या हल्ल्यात अश्विनी एकनाथ पाटील (वय २८) यांचा आज शनिवारी सकाळी मृत्यू झाला.मुलगा हावा यासाठी पतीचा आग्रह होता त्यातून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता.पतीकडून अश्विनीचा शारीरिक मानसिक जाच केला जात होता असे करवीरचे पोलीस उपनिरीक्षक निवास पवार यांनी सांगितले.
या प्रकरणी पती एकनाथ पाटील याला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.शनिवारी पहाटे दोनवडे येथे घटना घडली.पत्नीचा शॉक लागून मृत्यू झाला असा पतीने बनाव केला होता,मात्र करवीर पोलिसांच्या चौकशीत हा प्रकार उघडकीला आल्याचे सांगण्यात आले. दांपत्याला दोन मुली आहेत. मुलासाठी पतीचा आग्रह होता. त्यातून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. पतीकडून अश्विनीचा शारीरिक मानसिक जाचहाट केला जात होता. असेही करवीरचे पोलीस उपनिरीक्षक निवास पवार यांनी सांगितले. संशयित पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.
Previous Articleदौंड हत्याकांडातील पुरावे पोलिसांकडून हस्तगत
Next Article रिंग रोड संदर्भात नितीन गडकरी यांच्याशी चर्चा









