प्रतिनिधी,रायगड
Raigad Crime News : पनवेल मधील कामोठे येथे राहणाऱ्या एका महिलेच्या डोक्यावर वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. याबाबत मयत महिलेच्या भावाने कामोठे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा कक्ष दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाने आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
पनवेल शहरातील कामोठे परिसरात असलेल्या बिरप्पा श्रीरंग शेजाळ याने त्याच्या पत्नीच्या डोक्यात वार करून तिचा निर्घृण खून केला. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा करून जागेवरच मोबाईल बंद करून गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारसह फरार झाला होता. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.संदीप गायकवाड, प्रविण फडतरे, पोलीस उप निरीक्षक मानसिंग पाटील,पोहवा काटकर यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.
या पथकाने सीसीटीव्ही कॅमेरे तसेच तांत्रिक तपासच्या आधारे आरोपी हा आदमापुर ता.भुदरगड जि. कोल्हापूर येथे लपून राहत असल्याचे निष्पन्न झाले होते.त्याठिकाणी ठिकाणीं तात्काळ पोलीस पथक रवाना करुन आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.पोलिसांनी गुन्ह्याची चौकशी केली असता,त्याने पत्नीशी वारंवार होणाऱ्या घरगुती वादातून रागाच्या भरात डोक्यात हातोडी मारून तिचा खून केल्याची कबुली दिली आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी कामोठे पोलीस ठाणे याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Previous Articleकोमसाप तर्फे महामानव डॉ .आंबेडकर जयंती साजरी !
Next Article कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर असणारा फेस पॅक









