वृत्तसंस्था /माँट्रियल (कॅनडा)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या खुल्या कॅनेडियन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत हुबर्ट हुरकेझ आणि मॅटी पेव्हिक यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना विद्यमान विजेत्या वेस्ले कुलहॉप व स्कुपेस्की यांचा पराभव केला. पोलंडचा हुरकेझ आणि क्रोएशियाचा पेव्हिक या जोडीने कुलहॉप आणि स्कुपेस्की यांचा 6-7(2-7), 7-6(7-2), 10-5 अशा सेट्समध्ये पराभव केला. या सामन्यात हुरकेझ आणि पेव्हिक यांनी 14 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. पुरुष दुहेरीच्या अन्य एका सामन्यात गोन्झालेज आणि रॉजर व्हॅसेलिन यांनी ग्रीक्सपूर व लिहेका यांचा 6-2, 6-7(6-8), 10-6 असा पराभव केला.









