बेळगाव : शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्री देवदादा सासनकाठी चव्हाट गल्ली बेळगाव देवस्थानच्या वतीने श्री क्षेत्र वैजनाथ देवस्थान देवरवाडी येथे अभिषेक व महाप्रसादाचे नियोजन केले जाते.
सोमवारी (10, जुलै) देवस्थानच्या वतीने दुपारी महादेवाला अभिषेक घालून महाआरती करण्यात आली. त्यानंतर पार्वती मंदिर येथे पूजन करून वैजनाथ देवाला चांगला पाऊस होऊ दे, पीक पाणी चांगलं येऊ दे, रोगराई नष्ट होऊ दे असे साकडे घालण्यात आले.
लक्ष्मण किल्लेकर सासनकाटीचे पुजारी यांनी अभिषेक व पूजा केली. यावेळी नागेश नाईक, प्राचार्य आनंद आपटेकर, जोतिबा किल्लेकर, नामदेव नाईक, परिश्रम किल्लेकर, अनिकेत घोरपडे, अशोक कंगराळकर उपस्थित होते









