खानापूर : खानापूरमधील भाजप, निजदच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज एआसीसी निरीक्षक जी. निजामुद्दाrन काझी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खानापूर मतदासंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी त्यांचे स्वागत केले.

लक्केबैल, देवलट्टी, कामसिंकोप, पाfरशवाड, कागगनगी, आवरोली, इटागी, हिरेमुनावuली, चिक्कमुनावuली, बोगूर आणि चिक्कहट्टीहोली येथील कार्यकर्त्यांमुळे काँग्रेसला बळ मिळालं आहे. खानापूरमधील प्रत्येकाच्या चांगल्या भविष्यासाठी आमच्या व्हिजनला पाठिंबा देण्यासाठी अनेक व्यक्ती एकत्र आल्याचा आपल्याला अभिमान वाटतो, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.









