पाचगाव वार्ताहर
Kolhapur : शेंडा पार्क येथे झाडांमधील वाळलेल्या गवताला आग लागून शेकडो झाडे आगीत भस्मसात झाली.प्रशासनातील निर्भवलेल्या अधिकाऱ्यांनी झाडांमधील वाळलेले गवत वेळीच काढून घेण्याची कारवाई न केल्यामुळे शेकडो झाडे आगीच्या भक्षस्थानी पडली.शेंडा पार्क येथे लाखो रुपये खर्च करून सुमारे 40 हजार झाडे लावण्यात आली आहेत.या झाडांमधील वाळलेल्या गवताला सोमवारी दुपारी आग लागून शेकडो झाडे या आगीत भस्मसात झालीत.
शेंडा पार्क येथील माळावर लाखो रुपये खर्च करून सुमारे 40 हजार झाडे लावण्यात आली आहेत.या झाडांमधील गवत वाळले होते.या वाळलेल्या गवताला आग लागून मधील झाडे आगीत भस्मसात होण्याची शक्यता असल्याबाबतचे सविस्तर वृत्त दैनिक तरुण भारत मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते.मागील वर्षीही शेंडा पार्क येथील झाडांमधील वाळलेल्या गवताला आठ ते दहा वेळा आग लागली होती आणि या आगीत शेकडो झाडे भस्मसात झाली होती.
प्रशासनातील निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांनी मागीलवर्षी झाडे जळण्याच्या दुर्घटना पाहूनही यावर्षी ही झाडे आगीपासून सुरक्षित रहावीत यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही.वास्तविक शेतकऱ्यांनी हे वाळलेले गवत तातडीने काढून घेण्या बाबतची कारवाई अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक होते.वाळलेले गवत वेळीच काढून न घेतल्यामुळेच सोमवारी गवताला लागलेल्या आगीत शेकडो झाडे भस्मसात झाल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.संबंधित घटनेला अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आर. के. नगर परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









